विज्ञापित

पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!

शिरपुर:-सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि गावाच्या एकजुटीचा संदेश देत पिंप्री येथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात आहे
पिंप्रीत ‘एक गाव, एक गणपती’चा सामाजिक एकोप्याचा संदेश, श्री गणरायाची महाआरती उत्साहात संपन्न!

गावातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरूणांनी एकत्र येत “युवा प्रतिष्ठानच्या” पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या श्री गणरायाच्या महाआरतीस गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वटकेश्वर महादेव मंदिर प्रांगणात सोमवारी सायंकाळी महाआरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गावातील विविध भागांतील गणेशभक्तांनी एकत्र येत सामूहिक गणेशोत्सवाला दिलेला प्रतिसाद हा पिंप्रीच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा ठरला. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून उत्सवातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासोबतच गावकऱ्यांनी एकत्रितपणे सामाजिक व विधायक उपक्रम राबवावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाआरती दरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले. सामूहिक सहभागामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची किनार लाभली आहे. पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले, “‘एक गाव, एक गणपती’ ही केवळ गणेशोत्सवाची संकल्पना नसून गावाच्या एकजुटीचे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. विविध विचारांचे आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले गावकरी एका व्यासपीठावर एकत्र येऊन उत्सव साजरा करीत आहेत, ही पिंप्रीच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. या उपक्रमातून अनावश्यक खर्चाला आळा बसण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळू शकते. गणेशोत्सव शांतता, शिस्त आणि बंधुभावाने साजरा करून पिंप्रीने ‘एक गाव, एक गणपती’चा आदर्श निर्माण करावा.” युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत असून, सामूहिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकोपा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: