जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला ‘महिला लोकशाही दिन’
महिलांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून वेळेत निवारण व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्यात येतो. या महिला लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रारदार महिलांनी आपले तक्रार अर्ज घेऊन 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 01.00 वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे स्वतः उपस्थित राहावे. किंवा दुपारी 01.00 ते 02.00 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून https://meet.google.com/pkb-aygg-hqa या लिंकवर तक्रार मांडावी.
नियम व अटी:
• तक्रार ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची असावी.
• न्यायप्रविष्ट (न्यायालयात प्रलंबित), आस्थापनाविषयक तसेच सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यातील गरजू व पीडित महिलांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी या महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री. पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

