अक्कलकुवा महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न; १० दात्यांचे ‘रक्तदान’, जनजागृतीसाठी काढली रॅली
अक्कलकुवा:"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणत येथील विद्याविकास मंडळाच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात १० सुजाण दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. राष्ट्रीय सेवा योजना (NSS), रेड रिबन क्लब, ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा आणि आयसीटीसी (ICTC) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
केवळ शिबिर न घेता, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रक्तदानाचे महत्त्व पोहोचावे यासाठी महाविद्यालयातून एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेजारच्या गावांमध्ये फिरून या रॅलीच्या माध्यमातून ग्रामस्थांना रक्ताची गरज आणि रक्तदानाचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. भामरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेची सुरुवात केली.

विद्यार्थ्यांना समाजभान जपण्याचे आवाहन
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वतः पुढे येऊन रक्तदान करण्याचे आणि आपल्या परिसरातील नागरिकांमध्येही याविषयी सकारात्मकता निर्माण करण्याचे आवाहन केले. या शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. भामरे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पाटील आणि आयसीटीसीचे समुपदेशक महेश कुवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.