६०० वर्षांचा वारसा: नंदुरबारच्या प्राचीन अकडबंब महादेव मंदिरात श्रावण महापूजेचा उत्साह!

नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील ऐतिहासिक आणि अतिप्राचीन श्री अकडबंब महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्त भगवान शंकराची विधीवत पूजाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
६०० वर्षांचा वारसा: नंदुरबारच्या प्राचीन अकडबंब महादेव मंदिरात श्रावण महापूजेचा उत्साह!
600-varshanchaa-varasa-nandurbarchya-prachin-akad-bamb-mahadev-mandirat-shravan-mahapujecha-utsah

सुमारे ६०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून, सर्व भाविकांनी या पवित्र महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंकज त्रिवेदी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.असा आहे मंदिराचा दैवी इतिहास:या मंदिराची स्थापना सात पिढ्यांपूर्वी कै. पुरुषोत्तम महाराज यांच्या हस्ते झाली. असे सांगितले जाते की, ते स्वतःचे घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना जमिनीतून एक ‘स्वयंभू शिवलिंग’ प्रकट झाले. त्यानंतर हे स्थान ‘शंकारेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध पावले. कै. पुरुषोत्तम महाराज यांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळत, त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर १२ वर्षे अखंड तपश्चर्या केली होती. त्या काळात त्यांनी पितळी धातूची त्र्यंबक राजाची मूर्ती नंदुरबार येथे आणून तिची स्थापना केली.सामवेदाच्या मंत्रांनी होतो रुद्राभिषेक:या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे सामवेदाच्या मंत्रांनी महादेवाचा रुद्राभिषेक आणि पूजा केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात सामवेदीय पद्धतीने पूजा होणारे हे एकमेव मंदिर मानले जाते. श्रावण महिन्यात येथे रोज काळ्या मातीचे तब्बल ११०० पवित्र शिवलिंग बनवून त्यांची विशेष पूजा केली जाते. वंशपरंपरेनुसार कै. हरीशंकर महाराज, कै. गणपतराव महाराज, कै. विश्वनाथ महाराज, कै. जगन्नाथ महाराज, कै. श्रीकृष्ण महाराज, कै. महेश महाराज आणि श्री प्रेमशंकर महाराज यांनी ही पूजा अर्चा करण्याची परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे. या कार्यात समस्त श्रीमाळी ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते उत्साहाने मदत करतात.’अकडबंब महादेव’ नावामागची आख्यायिका:पूर्वीच्या काळी त्र्यंबकेश्वर मुखवट्याची महाशिवरात्रीच्या दिवशी देसाईपुरातील रंगमहाल येथून पालखी मिरवणूक काढली जात असे. मात्र, त्या काळी भास्कर जोशी यांच्या घराजवळ मूर्ती पडल्याने तिची कायमची छबी तेथेच उमटली आणि तेव्हापासून ती पालखी प्रथा बंद झाली. श्रावण महिन्यात आरतीनंतर येथे डिमक बाजे, डमरू आणि ‘अकडबंब डिमक बाजे डमरू नाचे सदाशिव जगद्गुरु’ असे अष्टक लयबद्ध आणि सुरेल पद्धतीने म्हटले जाते. हे अष्टक नेहमी बोलले जात असल्यानेच या मंदिराला ‘अकडबंब महादेव मंदिर’ हे अनोखे नाव पडले.या पवित्र श्रावण महिन्यात मंदिरात अभिषेक, पूजा, आणि महाआरती असे विविध धार्मिक सोहळे होत असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250