‘बालस्नेही पंचायत’ व ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रमातून बालहक्कांबाबत जनजागृती

बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने राज्यात ५ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘बालस्नेही पंचायत’ व ‘बालस्नेही प्रभाग’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘बालस्नेही पंचायत’ व ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रमातून बालहक्कांबाबत जनजागृती
balsnehi-panchayat-va-balsnehi-prabhag-upkramatun-balahakkanbabt-janjagruti

महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, UNICEF आणि यशदा (YASHADA) यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, अंगणवाडी केंद्रे, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच समाजातील सर्व घटकांनी या विशेष उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250