विज्ञापित

शेतकऱ्यांच्या घामाला मिळणार जागतिक मोल! ‘मॅग्रेट २.०’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतीत ₹१,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीचा महायज्ञ

(मुंबई) काळ्या मातीत राबणाऱ्या महाराष्ट्रातील बळीराजाच्या कष्टाला आता जागतिक बाजारपेठेचे सुवर्णवलय लाभणार आहे महाराष्ट्र आता केवळ धान्य पिकवणारे राज्य न राहता, शेतीमालावर प्रक्रिया करणारा, त्याचे मूल्यवर्धन करणारा आणि तो जगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात निर्यात करणारा ग्लोबल ॲग्री-हब बनण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे
शेतकऱ्यांच्या घामाला मिळणार जागतिक मोल! ‘मॅग्रेट २.०’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतीत ₹१,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीचा महायज्ञ
magret-2-maharashtra-agriculture-investment-1000-crore-farmers

मुंबईत पार पडलेल्या मॅग्रेट प्रीबिजनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’ (MAGNET Pre-Business Infrastructure Investor Meet) मध्ये राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या कृषी क्रांतीचा मार्ग आराखडा जाहीर केला. ‘मॅग्रेट २.०’ (MAGNET 2.0) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राज्यातील ६ प्रमुख पिकांच्या समूहांसाठी ₹१,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या संधी खुल्या करण्यात आल्या असून, खाजगी क्षेत्राला या समृद्धीच्या प्रवासात भागीदार होण्याचे खुले आवाहन त्यांनी केले आहे

विज्ञापित
६ प्रमुख पिकांवर लक्ष केंद्रित: शेतशिवारात रोजगाराची नवी पहाट
महाराष्ट्रातील पारंपरिक शेतीला कॉर्पोरेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सरकारने ६ प्रमुख पिकांचे क्लस्टर्स तयार केले आहेत:
  •  केळी | द्राक्षेआंबालिंबूवर्गीय फळेकाजूहळद
या पिकांच्या काढणीपश्चात होणारे नुकसान रोखणे, आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे आणि प्रतवारी करून थेट आंतरराष्ट्रीय खरेदीदारांपर्यंत शेतीमाल पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

 मॅग्रेट १.० चे यश: महिला शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोनेरी बदल
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याने राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली आहे:
  • ४,३०० थेट रोजगारांची निर्मिती: यातील बहुतांश रोजगार ग्रामीण भागातील महिलांना मिळाले आहेत.
  • ४५% महिला शेतकरी लाभार्थी: २.३२ लाख लाभार्थ्यांमध्ये महिलांचा मोठा वाटा असून ३३,००० हून अधिक शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळाले.
  • ८% पिकांची नासाडी थांबली: modern cold chain तंत्रज्ञानामुळे शेतमालाचे नुकसान ८ टक्क्यांनी घटले आहे.
  • २५०+ उपप्रकल्पांना बळ: १४,५०० मेट्रिक टन शीतगृह क्षमतेसह २५० हून अधिक स्थानिक प्रकल्पांना थेट अर्थसहाय्य पुरवण्यात आले.
वधवण बंदर: महाराष्ट्राच्या शेतीमालाचा जागतिक महामार्ग!
“पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उभारले जाणारे वधवण बंदर (Vadhavan Port) हे महाराष्ट्राच्या शेतीमालाला आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणारे गेम-चेंजर ठरेल. जयकुमार रावल, पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य
रेल्वे, समृद्धी महामार्ग आणि एक्सप्रेसवे जोडणी असलेल्या वधवण बंदरामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा माल अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय जहाजांवर लोड होऊ शकेल. हे बंदर केवळ वाहतुकीचे केंद्र नसून निर्यातदार, प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) एकत्र आणणारा जागतिक मंच ठरेल. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या व्हिजनला हे बंदर नवी गती देईल.
 दिग्गज कॉर्पोरेट्स आणि १०+ देशांच्या महावाणिज्यदूतांची उपस्थिती
या इन्व्हेस्टर मीटमध्ये जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठा उत्साह दाखवला:
  • कॉर्पोरेट दिग्गज: ॲमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), विप्रो (Wipro), सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) आणि व्हिटास सिड (Vitas Seed) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली.
  • जागतिक महावाणिज्यदूत: कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, दक्षिण कोरिया, इटली, चेक प्रजासत्ताक, मॉरिशस, अर्जेंटिना आणि युगांडा या देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींनी महाराष्ट्राच्या कृषी मॉडेलचे कौतुक केले.
  • प्रशासकीय प्रमुख: मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी (‘मित्रा’ सीईओ), पणन प्रधान सचिव प्रवीण दराडे, आशियाई विकास बँकेचे (ADB) ताकेशी उप्पुडा व ख्रिसन रोतेला यांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या धोरणावर मोहर उमटवण्यात आली.
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: