Home शैक्षणिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0
Memorandum submitted to the Tehsildar on behalf of the Nandurbar District Headmasters' Association regarding various pending demands of teachers.

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना टी.ई. टी. अनिवार्यता, SIR मोहीम, BLO कामकाज व 01 नोव्हेंबर 2005 नियुक्त व त्यानंतर 100 % अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करणे बाबत, तसेच इतर अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात शिक्षक असमर्थ ठरत असून वरील सर्व कामे ही आरटीई 2009 नुसार शिक्षकांकडून काढून घ्यावेत. या कामांसाठी शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा पाहता विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण ढासळत चाललेले आहे. वरील सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी व शिक्षकांना योग्य न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत सदरील संदेश, निवेदन पोहचवण्यासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ नंदुरबार यांच्या वतीने तहसीलदार नंदुरबार यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील खाजगी आस्थापनातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांनी आज काळ्याफिती लावून कामकाज केले.निवेदनाच्या वेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, नंदुरबार तालुका अध्यक्ष कपूरचंद मराठे, सचिव फैयाज खान, कोषाध्यक्ष डी.डी. साळुंके, खाजगी प्राथमिक शाळांचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, अभिनव विद्यालय नंदुरबार मुख्याध्यापक, तारकेश्वर पाटील उपस्थित होते.