वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार

राजापूर:-तालुक्यातील वडवली गावात कित्येक वर्षांपासून दोन स्मशानभुमी आहेत एक स्मशानभूमी बौध्द समाजासाठी व दुसरी इतर सर्व धर्मीयांसाठी. परंतु 20 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली या सभेत गावचे स्थानिक ग्रामस्थ रमेश ना. जाधव यांनी सभेपुढे मुद्दा उपस्थित केला व त्याला विश्राम जाधव यांनी अनुमोदन दिले त्यावेळी त्यांनी प्रश्न केला असे का ?' मुंबई किंवा इतर शहरामधे एकाच हिंदू स्मशानभूमीत बौद्ध समाजासहीत इतर सर्व हिंदू धर्मीयांच्या मृतदेहाचे एकाच ठीकाणी अंत्यसंस्कार होतात मग ग्रामीण गावात हा भेदभाव का? तर असा भेदभाव न ठेवता गावातील सर्व धर्मीयांच्या मृतदेहाचे एकाच स्मशान भुमीत अंत्यसंकार झाले पाहिजे यावर सर्व ग्रामस्थांनी सामाजिक समतेच्या जाणीवेचे भान ठेऊन एकाच स्मशानभूमीत सर्व धर्मीयांच्या मृतदेहांचे अत्यसंकार होतील हा विषय एकमताने मंजूर केला गेला खरोखर या गावाने इतरांसमोर हा आदर्श ठेवला व इतर गावांनी प्रेरणा घ्यावी असे समाजापुढे उदाहरण निर्माण केले.
वडवली ग्रामस्थांचा सामाजिक समतेचा संदेश, गावातील एकाच स्मशानभूमीत होणार सर्व धर्मियांचे अंत्यसंस्कार
Vadavli villagers send a message of social equality; funeral rites for people of all faiths will be performed at the village's single cremation ground.

अशा या वडवली गावाचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.
यावेळी या सभेचे कामकाज सन्मा. सरपंच सौ. प्रमिता प्रमोद शिंदे, उपसरपंच अंकुश काशीराम शिंदे तसेच ग्रामसेवक विलास सोबण यांनी पाहिले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी हा सामाजिक समतेचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.