नंदुरबार जिल्ह्याला दिलासा: महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर श्रावण सरींचे जोरदार आगमन, पिकांना मिळालं नवजीवन!
नंदुरबार:गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर नंदुरबार शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी झालेल्या या दमदार पावसामुळे तापलेल्या धरणीला गारवा मिळाला असून, चिंतेत असलेल्या बळीराजासह सामान्य नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

नंदुरबार शहरासह धडगाव, शहादा आणि इतर ग्रामीण भागात काल सकाळपासूनच पावसाचे ढग दाटून आले होते. पहाटेपासूनच रिमझिम सुरू असलेल्या या पावसाने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. सलग चार तास कोसळलेल्या या मुसळधार श्रावणसरींमुळे सर्वत्र पाण्याचे लोट वाहू लागले. काल सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती.
पिकांना मिळालं ‘नवजीवन’
गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कमालीचा हवालदिल झाला होता. कडक ऊन आणि सतत वाढणाऱ्या तापमानामुळे शेतातील उभी पिके करपू लागली होती, पिकांची पाने सुकू लागली होती. त्यामुळे यंदा खरीप हंगाम हातातून जातो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, काल झालेल्या या दमदार पावसामुळे सुकणाऱ्या पिकांना जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या पावसामुळे जमिनीतील आणि जलशांमधील पाणीपातळीतही काहीशी वाढ झाली आहे.

अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
कालच्या पावसाने पिकांना तात्पुरता दिलासा दिला असला, तरी खरीप हंगामातील पिकांची योग्य वाढ होण्यासाठी आणि विहिरी-धरणे पूर्ण भरण्यासाठी जिल्ह्यात अजूनही एका मोठ्या आणि जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळातही असाच चांगला पाऊस पडावा, अशी आळवणी आता जिल्ह्यातील बळीराजा वरुणराजाकडे करत आहे.

तापमानातील वाढीमुळे हैराण झालेल्या शहरी नागरिकांना या पावसामुळे आलेल्या सुखद गारव्याने मोठा दिलासा दिला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Follow Us: