ऑनलाइन म्हैस विक्रीचे आमिष; शेतकऱ्याची ६२ हजारांची फसवणूक

अकोला येथे ऑनलाइन म्हशी विक्रीची माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने यूट्यूबवरील कार्यक्रमातून म्हशी विक्रीची माहिती देत कमी किमतीत घरपोच म्हैस देण्याचे आमिष दाखवले.
ऑनलाइन म्हैस विक्रीचे आमिष; शेतकऱ्याची ६२ हजारांची फसवणूक
Online Buffalo Sale Scam; Farmer Duped of ₹62,000

त्यानंतर ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगून एका शेतकऱ्याकडून सुमारे ६२ हजार रुपये घेतले. याप्रकरणी अकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.