मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती देखील पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत होऊन त्याचे निकालही वेळेत लागले पाहिजेत. तथापि, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे देखील तितकेच सुरळीत असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला तयारीसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट २०२७ पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
@mpsc_office

