चीन, तिबेट आणि नेपाळ च्या पूरग्रस्त भागात बचाव व मदतकार्य सुरू आहे
३१ ऑगस्ट अखेर पर्यंत प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातून ४०६ नागरिक आपत्तीमध्ये अडकले होते यापैकी रिचा टूर्स तर्फे गेलेले ६० आणि अन्य चार पर्यटक नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारताची बचाव पथके घटनास्थळी तैनात असून हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्र (एसईओसी) परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाशी नियमित संपर्कात आहे.
नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार पर्यटक नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला वेग आला असून मृतांची ओळख पटविण्यासाठी १९ सदस्यीय न्यायवैद्यक पथक काठमांडू येथे दाखल झाले आहे. यामुळे संबंधित कुटुंबीयांना त्यांच्या आप्तस्वकीयांबाबत अधिकृत माहिती मिळण्यास मदत होईल. परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधला जात असून अडकलेल्या नागरिकांची माहिती अद्यावत केली जात आहे. अद्ययावत माहिती परराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येत आहे.

