ओझर(प्रतिनिधी):-आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपल्यावर मोठे ऋण आहेत या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे आपल्या सारखेच होतकरु, गरजू आणि शेतकरी कष्टकरी कुटुंबातील आहेत याही वर्षी जाणीवेतून माजी विद्यार्थी संघ ओझर यांच्यामार्फत ओझर शाळा नं 2 मधील सर्व मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कामी माजी विद्यार्थी संघ,ओझर नं 2, साबळेवाडीचे अध्यक्ष बाळू साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सेवा सहयोग संस्थेमार्फतही सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी रविंद्र मासये आणि बंदसोडे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष चंद्रकांत कुर्ले,बाळू साबळे, विकास गितये, संजय बेहेरे, संदीप साबळे, संतोष कुर्ले, बापू कुर्ले, अमोल ताम्हणकर, रुपेश हातणकर आणि विद्यार्थी संघाचे सल्लागार चंद्रकांत म्हादये, गणपत ताम्हणकर, अनंता हातणकर, रमेश ताम्हणकर आदीं मान्यवर उपस्थित होते.
















