राज्यातील युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; २९ सप्टेंबरला महाराष्ट्रभर ‘रोजगार महाकुंभ’

राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात 'रोजगार महाकुंभ' आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले.
राज्यातील युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी; २९ सप्टेंबरला महाराष्ट्रभर ‘रोजगार महाकुंभ’
A golden employment opportunity for the state's youth; 'Rojgar Mahakumbh' across Maharashtra on September 29.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250