बेकायदेशीर गर्भलिंग निदान होत असल्याचा संशय आहे?
महाराष्ट्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी PCPNDT कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. गर्भलिंग निदान होत असल्याचा संशय असल्यास नागरिकांनी गप्प न राहता तातडीने तक्रार नोंदवावी.
तक्रार किंवा शंकेचे निरसन करण्यासाठी आरोग्य विभागाची १०४ टोल-फ्री हेल्पलाइन २४ तास उपलब्ध आहे. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्याची तरतूद असून, तक्रारीच्या आधारे संबंधित यंत्रणेकडून तपास व कायदेशीर कारवाई केली जाते.
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तक्रार करा आणि ‘मुलगी वाचवा’ अभियानाला हातभार लावा.

